1 May Maharashtra Din/Kamgar Din
Song | Maharashtra Bhoomi Hee Janmbhoomi |
Singer | Swapnil Bandodkar |
Lyricist | Shrirang Godbole |
Music | Ajay-Atul |
महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, ही कर्मभूमी ही अमुची Lyrics
ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी ही अमुची
महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची
हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली
अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरीपटक्याची
महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, ही कर्मभूमी ही अमुची
महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची
राकट देश, कणखर देशा, दगडाच्या देशा
प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा
भीमा, वरदा, कृष्णा, कोयना, भद्रा, गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या गहगरी
योग्यांची अन् संतांची, भक्तांची माळकऱ्यांची
ही देव देश अन् धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची
योद्धयांची अन वीरांची, तलवारीच्या पात्याची
देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची
ही भूमी सप्तसुरांची, रंगांची, अष्टकलांची
काव्याची, शास्त्र-विनोदाची, ही भूमी साहित्याची
महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, ही कर्मभूमी ही अमुची
महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची