Ashtavinayak Yatra

१) मोरगावचा मयुरेश्वर

अष्टविनायकांमध्ये हे दैवत प्रमुख मानले जाते. कर्ह नदीच्या काठावर पुण्यापासुन ६४ किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे. येथील मंदिराभोवती पन्नास फूट उंचीची तटबंदी आहे. नगारखान्याखाली श्री मोरेश्वरासन्मुख एक भव्य दगडी मंदिर आहे. पश्चिमेच्या बाजुला तरटीचा एक व्रुक्ष आहे. त्याखाली बसून श्री मोरया गोसावींनी तपश्चर्या केली होती. मंदिराच्या गाभाऱ्यात मयुरेश्वर गणपतीची सुंदर मूर्ती आहे. मूर्तीच्या कपाळावर व बेंबीत रत्त्ने जडविलेली आहेत. मूर्तीच्या डाव्या व उजव्या बाजुला सिद्धिबुद्धी या देवता आहेत. पुढ्यात उंदीर व मोर आहेत. मोर हे गणेशाचे वाहन असल्याने त्याला मयुरेश्वर हे नाव मिळाले. या मूर्तीच्या मस्तकावर नागराजाचा फ़णा आहे. भाद्रपथ चतुर्थी आणि माग चतुर्थी या दिवशी येथे मोठे उत्सव असतात. दसरयाच्या दिवशी येथे उत्सव असतो. सोमवती अमवस्यांना येथे उत्सव करण्याची प्रथा आहे.
———————————————————————————————–
२) थेवुरगावचा श्री चिंतामणी

थेवुरचे हे स्थान हवेली तालुक्यात पुण्यापासुन साधारण २२ किलोमीटर आहे. थोरले माधवराव पेशवे आणि त्याच्या पत्नि रमाबाई यांच्या सानिध्यामुळे या स्थानाला महत्व प्राप्त झाले. श्रीमंत माधवरावांची श्री चिंतामणीवर अपार भक्ती होती. श्री मोरया गोसावींनी थेवुरच्या अरण्यात तपश्चर्या केली होती. त्यांना याच ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली. येथील मूर्तीचे तोंड पूर्वेकडे आहे. मूर्तीने आसनमांडी घातलेली आहे. भाद्रपथ चतुर्थीला येथे मोठा उत्सव असतो.
———————————————————————————————–
३) सिद्धटेकचा श्री सिद्धीविनायक

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात हे स्थान आहे. येते श्री सिद्धीविनायकाचे मंदिर आहे. येते जाण्यासाठी पुण्याहून रेल्वेने दौंडला जाऊन तेथून सिद्धटेक फक्त तेरा किलोमीटर आहे. भगवान विष्णुंना येते सिद्धी मिळाली म्हणून या श्रेत्राला सिद्धक्षेत्र नाव मिळाले. येथिल मंदिर एका टेकडीवर आहे. मंदिराचे तोंड उत्तर दिशेकडे आहे. मंदिर पेशवेकालीन असून भव्य गाभारा पुण्याश्लोक अहल्याबाई होळकर यांनी बांधला आहे. श्री सिद्धीविनायकाची मूर्ती सुमारे तीन फूट उंच असून ती स्वयंभू आहे. मूर्तीची सोंड उजव्या बाजूला आहे. तर मांडीवर ऋद्धीसिद्धी बसलेल्या आहेत. भाद्रपथ आणि माघ महिन्यात शुक्ल प्रतिपदा ते पंचमी या काळात येथे उत्सव साजरे होतात.
———————————————————————————————–
४) रांजणगावचा श्री महागणपती

पुणे जिल्हयातील हे स्थान शिरुर तालुक्यात पुण्यापासून साधारण ५० किलोमीटर अंतरावर आहे. भगवान शंकरांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या करुन त्रिपुरासुरावर विजय मिळवला तेच हे श्री महागणपतीचे श्रेत्र रांजणगाव, याचे पुर्वीचे नाव मणिपुर असल्याची आख्यायिका सांगितली जाते. येथील मंदिर पूर्वाभिमुख आहे. उत्तरायण किंवा दक्षिणायन मध्यकाळात सूर्याचे किरण नेमके मूर्तीवर पडतात. मंदिराचा आतील गाभारा आणि बाहेरचा भाग श्रीमंत थोरले माधवराव यांनी बांधला आहे. या मूर्तीची सोंड डावीकडे आहे. मांडीचे आसन असून कपाळ रुंद आहे. दोन्ही बाजूला ऋद्धीसिद्धी उभ्या आहेत. भाद्रपथ शुक्ल चतुर्थीला येथेही मोठा उत्सव असतो.
———————————————————————————————–
५) ओझरचा श्री विघ्नेश्वर

ओझर हे ठिकाण अतिशय नयनरम्य आहे. अष्टविनायकामध्ये श्री विघ्नेश्वराल विशेष महत्व आहे. पुणे नशिकपासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर ओझर हे स्थान आहे. या देवळाच्या मंदिरावरील शिखर चिमाजी अप्पानी बांधले आहे. वसईचा किल्ला जिंकून परत येताना त्यांनी या देवळाचा जीर्णोधार केला. या विघ्नेश्वराची उपासना केल्यास विघ्ने दूर होतात. असा भक्तांमध्ये विश्वास आहे. हे मंदिरही पूर्वाभिमुख आहे माहाद्वारापाशी दोन उंच दिपमाळा आहेत. ओवरयांच्या दगडी कमानी आहेत. सभामंडपाच्या दारातच उंदराच्या सुंदर मुर्ती आहेत. तिसरया सभामंडपात श्री विघ्नेश्वराची पुर्वाभिमुख मुर्ती असून ती डाव्या सोंडेची आहे. मुर्तीच्या मस्तकात हिरा असून दोन्ही डोळ्यांच्या ठिकाणी माणके आहेत. श्री विघ्नेश्वराच्या दोन्ही बाजूंस ऋद्धीसिद्धीच्या पितळी मुर्ती आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *