Mala Ved Lagale Premache Lyrics Song sung by Swapnil Bandodkar and Ketaki Mategaonkar and Music given by Chinar-Mahesh. Lyrics written by Guru Thakur. The song video starring Prathamesh Parab and Ketaki Mategaonkar.
Song | Mala Ved Lagale Premache |
Movie | Timepass |
Singer | Swapnil Bandodkar and Ketaki Mategaonkar |
Lyricist | Guru Thakur |
Music | Chinar-Mahesh |
Cast | Prathamesh Parab and Ketaki Mategaonkar |
Mala Ved Lagale Premache Lyrics in Marathi
रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा
कुंद कळ्यांना वेलींना सांगा रे सांगा
हे भास होती कसे
हे नाव ओठी कुणाचे
का सांग वेड्या मना
मला भान नाही जगाचे
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे.. प्रेमाचे
नादावले धुंदावले कधी गुंतले मन बावळे
न कळे कधी कोणामुळे सुर लागले मन मोकळे
हा भास की तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे.. प्रेमाचे
जगणे नवे वाटे मला कुणी भेटला माझा मला
खुलता कळी उमलून हा मन मोगरा गंधाळला
हा भास की तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे.. प्रेमाचे