शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भिती
शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भिती
देव, देस अन धर्मापाई प्राण घेतलं हाती
शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भिती
आईच्या गर्बात उमगली झुंजाराची रीत
आईच्या गर्बात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं, जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलून घेईल अशी पहाडी छाती
देव, देस अन धर्मापाई प्राण घेतलं हाती
शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भिती
जिंकावे वा कटून मरावं हेच आम्हाला ठाव
जिंकावे वा कटून मरावं हेच आम्हाला ठाव
लढून मरावं, मरून जगावं हेच आम्हाला ठाव
देसापाई सारी विसरू माया, ममता, नाती
देव, देस अन धर्मापाई प्राण घेतलं हाती
शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भिती
Album | Maratha Tituka Milwawa |
Lyricist | Hridaynath Mangeshkar |
Director | Bhalji Pendharkar |
Singer | Hridaynath Mangeshkar |
Music | Anandghan |
Cast | Alhaad, Kashinath Ghanekar, Chandrakant Gokhale, Sulochana Latkar |